Skip to main content

Most Recent

Amazon जंगलाचं हे रहस्य तुम्हाला माहिती आहे का?

जगातील सर्वात रहस्यमयी जंगलांच नाव घेतल की त्यामध्ये सर्वात आधी नाव येत अमेझॉन जंगलाचं हे जंगल जगातील सर्वात मोठे जंगल आहे .हे जंगल पश्चिम ब्राझील पासून कोलंबिया पेरू दक्षिण चा काही देशपर्यंतर पोहचलेले आहे हे जंगल 55,00,000 sq/km इतके आहे.  हे जंगल भारत देशा पेक्षा ही आकाराने मोठे आहे या जंगलातले रहस्य आजून ही वैज्ञानिकांची  मात्र रहस्य च आहेत. अमेझॉन चा जंगलात चारशे कोटी पेक्षा जास्त झाडे आहेत .आणि हे झाडे इतके लांब व  मोठे  असतात की जमिनीवर सूर्य प्रकाश देखील पडून देत नाहीत . या जंगलात सुमारे सतरा हजार झाडांचे प्रकार आहेत याला लग्स ऑफ द वर्ल्ड असे ही मानतात.कारण जगात सर्वात जास्त ऑक्ससीजन येतून नच येतो अमेझॉन ही नदी जगातील दुसरी सर्वात मोठी नदी आहे आणि या नदीत पाच हजार पेक्षा जास्त माशाचे प्रकार आढळतात अमेझॉन मध्ये खूप मोठे साप आहेत . खूप वेळा लोकांनी हे पहिले देखील आहेत या जंगलातल्या खूप साऱ्या झाडांचे प्रकार आहेत त्यामधले आपल्याला खूप मोठे तर माहीत देखील नाहीत या जंगलात खूप सा रे प्राणी पक्षी आहेत . या जंगलात दर वर्षी हजारो लोक बेपत्ता होतात त्यापै...

कोरोनाचे पॅकेज म्हणजे टीव्हीवरील ‘सिरियल’ नाही की जिचा ‘प्रोमो’ पंतप्रधानांनी दाखवावा आणि अर्थमंत्र्यांनी रोज एक ‘एपिसोड’ सादर करावा

 काही दिवसापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल माध्यमावर लाईव्ह येत कोरोनाच्या संकटावर उपाययोजना म्हणून  आत्मनिर्भर विकास योजनेच्या नावाने 20 लाख करोड रुपयाचे विशेष आर्थिक पॅकेज घोषित केले होते.
 त्याचाच एक भाग म्हणून केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन ह्या रोज सोशल माध्यमावर लाईव्ह येत पत्रकार परिषदा घेऊन त्या विशेष आर्थिक पॅकेजच्या टप्प्याटप्प्याने वेगवेगळ्या घोषणा करत आहे. पण ज्या दिवसापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या विशेष पॅकेजची घोषणा केली आहे, आणि ज्याप्रमाणे अर्थमंत्री निर्मला सितारामन ह्या आर्थिक पॅकेजच्या तरतुदी रोज रोज जाहीर करत आहेत,  यावरून विरोधी पक्षातील नेत्यांनी सरकारला चांगलेच धारेवर धरले आहे. यावेळी महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान बांधकाम मंत्री व  नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांनी देखील केंद्र सरकारवर निशाणा साधत सोशल मीडियावर एक post  केली आहे. ज्यामध्ये त्यांनी सरकारच्या विशेष आर्थिक पॅकेजवर  आश्चर्यव्यक्त करत खरमरीत टीका केली आहे.





अशोक चव्हाण यांनी त्यांच्या सोशल माध्यमावर लिहिलेली पोस्ट आम्ही खालील प्रमाणे जशास तशी देत आहोत.

पॅकेज म्हणजे अर्थसंकल्पात करावयाच्या घोषणा नव्हेत!

कोरोनासारख्या जागतिक आपत्तीच्या काळातील मदत पॅकेज कसे असते ते केंद्र सरकारने समजून घेतले पाहिजे. अशा पॅकेजमध्ये तातडीची व भरीव मदत तसेच तत्कालीन उपाययोजनांवर भर असला पाहिजे. अर्थसंकल्पात जाहीर करावयाचे दीर्घकालीन उपाय म्हणजे पॅकेज असू शकत नाही.

शेतकऱ्य़ांसाठी जाहीर झालेल्या आजच्या पॅकेजमध्ये थेट मदत म्हणून शेतकऱ्यांना साधा रूपयाही मिळालेला नाही. आजच्या घोषणांमध्ये बहुतांश घोषणा पायाभूत सुविधांशी निगडित भविष्यकालीन व दीर्घकाळाच्या उपाययोजना आहेत. अशा घोषणा साधारणतः अर्थसंकल्पात केल्या जातात.

खरीपाच्या तयारीसाठी आज शेतकऱ्यांना थेट भरीव मदतीची गरज आहे. अधिकाधिक सुलभ पद्धतीने पुरेशा वित्तपुरवठ्याची आवश्यकता आहे. त्यांच्यावरील कर्जाचा जुना बोजा कमी कऱण्याची गरज आहे. त्यांना कमीत कमी किंमतीत बी-बियाणे, खते, किटकनाशके उपलब्ध करून देण्याची निकड आहे. शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी राज्य सरकारांकडे सहकार्याचा हात पुढे करण्याची आवश्यकता आहे. मात्र, त्याऐवजी काही पायाभूत सुविधा आणि नवीन नियमांच्या घोषणा करणे म्हणजे शेतकऱ्यांची शुद्ध फसवणूक आहे.

कोरोनावरील पॅकेज जाहीर करण्याच्या केंद्र सरकारच्या पद्धतीवरही त्यांनी टिकेची झोड उठवली. केंद्र सरकारला ज्या घोषणा करायच्या आहेत, त्या एकाच दिवशी करणे सहज शक्य आहे. मात्र, २० लाख कोटी रूपयांच्या तथाकथित पॅकेजची घोषणा पंतप्रधानांनी करायची आणि त्यातील तरतुदींची माहिती अर्थमंत्र्यांनी दररोज पत्रकार परिषदेत जाहीर करायची, हा प्रकार आश्चर्यकारक आहे. 

कोरोनाचे पॅकेज म्हणजे टीव्हीवरील ‘सिरियल’ नाही की जिचा ‘प्रोमो’ पंतप्रधानांनी दाखवावा आणि अर्थमंत्र्यांनी रोज एक ‘एपिसोड’ सादर करावा!

पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांची ही केंद्र सरकारवर निशाना साधणारी खरमरीत पोस्ट पाहून, अनेक जण मजेदार प्रतिक्रिया देत व्हायरल करत आहेत.


Comments