Skip to main content

Most Recent

Amazon जंगलाचं हे रहस्य तुम्हाला माहिती आहे का?

जगातील सर्वात रहस्यमयी जंगलांच नाव घेतल की त्यामध्ये सर्वात आधी नाव येत अमेझॉन जंगलाचं हे जंगल जगातील सर्वात मोठे जंगल आहे .हे जंगल पश्चिम ब्राझील पासून कोलंबिया पेरू दक्षिण चा काही देशपर्यंतर पोहचलेले आहे हे जंगल 55,00,000 sq/km इतके आहे.  हे जंगल भारत देशा पेक्षा ही आकाराने मोठे आहे या जंगलातले रहस्य आजून ही वैज्ञानिकांची  मात्र रहस्य च आहेत. अमेझॉन चा जंगलात चारशे कोटी पेक्षा जास्त झाडे आहेत .आणि हे झाडे इतके लांब व  मोठे  असतात की जमिनीवर सूर्य प्रकाश देखील पडून देत नाहीत . या जंगलात सुमारे सतरा हजार झाडांचे प्रकार आहेत याला लग्स ऑफ द वर्ल्ड असे ही मानतात.कारण जगात सर्वात जास्त ऑक्ससीजन येतून नच येतो अमेझॉन ही नदी जगातील दुसरी सर्वात मोठी नदी आहे आणि या नदीत पाच हजार पेक्षा जास्त माशाचे प्रकार आढळतात अमेझॉन मध्ये खूप मोठे साप आहेत . खूप वेळा लोकांनी हे पहिले देखील आहेत या जंगलातल्या खूप साऱ्या झाडांचे प्रकार आहेत त्यामधले आपल्याला खूप मोठे तर माहीत देखील नाहीत या जंगलात खूप सा रे प्राणी पक्षी आहेत . या जंगलात दर वर्षी हजारो लोक बेपत्ता होतात त्यापै...

रहस्यमय.. "काका मला वाचवा" शनिवारवाड्यात अजूनही ऐकू येते ही हृदयद्रावक हाक

गड, किल्ले, वाडे, राजपाट मिळवणं आणि मिळाल्यानंतर त्या आपल्या ताब्यात ठेवण्याकरता राजनिती, कुटनिती, षडयंत्र रचणं या गोष्टी इतिहासाच्या पानांमधे दडलेल्या आपल्याला आढळतात







.
त्या पाहुन, वाचुन असं वाटतं की खरच ही षडयंत्र घडली असतील? कशी रचली गेली असतील? काय काय घडले असेल? कोण कोण सहभागी असेल?
या विचारांनी आपण बैचेन होतो आणि उत्कंठा वाढते त्या घटना जाणुन घेण्यासंबधीची.







पुण्यातील पेशव्यांचा शनिवारवाडा हा ऐतिहासीक तर आहेच शिवाय अनेक गुढ रहस्य, घटना आणि आपल्या अजोड बांधकामामुळे आज देखील कुतुहलाचा आणि आश्चर्याचा विषय बनला आहे






या शनिवारवाडयाची मुहूर्तमेढ 10 जानेवारी 1730 ला शनिवारी रोवण्यात आली म्हणुन त्याला नाव पडले शनिवारवाडा. त्यानंतर 22 जानेवारी 1732 रोजी प्रचंड मोठया उत्साहात आणि दिमाखात वास्तुशांत करण्यात आली. त्या काळात 16,110 ईतका खर्च हा वाडा बांधण्याकरता आला.







या महालात एकाच वेळी 1000 लोक राहु शकत होते अश्या प्रकारची सोय या वाडयात करण्यात आली होती. 27 फेब्रुवारी 1828 ला या वाडयाला आग लागली आणि ती आग विझवण्याकरता त्यावेळी तब्बल 7 दिवस लागले. पण ही आग कशी लागली हे आज देखील एक गुढ आणि रहस्य बनुन राहीले आहे.







राघोबादादा आणि आनंदीबाई यांचे आपला पुतण्या नारायण रावाशी संबंध चांगले राहिले नव्हते त्याचे मुख्य कारण असे की फार लहान वयात नारायण रावांना पेशवा बनविलेले या पतीपत्नींना अजिबात रूचले नव्हते.







त्यामुळे संबंध ईतके ताणले गेले होते की काका पुतण्यांमधुन विस्तव देखील जात नव्हतां आणि मध्यस्थी प्रकरण मिटवण्यापेक्षा आगीत तेल ओतण्याचेच काम करीत होते.







मारेक.यांकरवी रघुनाथरावांनी “नारायणरावाला धरा” असा आदेश निर्गमीत केला पण तो आदेश आनंदीबाईंच्या हाती लागला आणि त्यांनी कुट कारस्थान रचले नारायणरावाला धरा ऐवेजी “नारायणरावाला मारा” असे करण्यात आले आणि “ध चा मा” करणारी आनंदीबाई या एकाच गोष्टीमुळे इतिहासात प्रसिध्दीला आली.







आज देखील या एका घटनेमुळे “ध चा मा नको करूस” हा वाक्प्रचार प्रचलीत झाला आहे.
(काही जाणकारांच्या मते हे खरे नाही, नारायणरावाला मारण्याचे आदेश खुद्द रघुनाथरावांनीच दिले आणि त्यांच्या डोळयासमोरच नारायणरावाला मारण्यात आले आणि त्यांचे तुकडे करून त्याच रात्री नदीत सोडण्यात आले)







नारायणराव आपल्या कक्षातुन संपुर्ण वाडयात “काका मला वाचवा” असे जोरात ओरडत धावत होते पण मारेक.यांनी कुठलीही दयामाया न दाखवता आनंदीबाईंच्या निर्णयामुळे नारायणरावाची अतिशय क्रुरपणे हत्या केली आणि त्यांच्या आरोळया या शनिवार वाडयात घुमत राहिल्या







नारायणरावांच्या या किंकाळया त्यांच्या मृत्युबरोबरच आसमंतात विरणा.या नव्हत्या, या आरोळया त्यांच्या मृत्युपश्चात देखील शनिवार वाडयात आजही ऐकु येतात असे कित्येकांचे म्हणणे आहे.







आजही पिशाच्च बाधीत स्थळांच्या कुठल्याही यादीत पुण्याच्या या शनिवारवाडयाचा उल्लेख आपल्याला आढळतोच.

Comments