साहस आणि चातुर्याच्या जोरावर छत्रपती शिवाजी महाराजांनी अनेक लढाया जिंकल्या या माघे महाराजांची सक्षम गुप्तहेर यंत्रणा कारणीभूत नक्कीच ठरली. कुठल्याही लष्करात गुप्त हेर यंत्रणा जेवढी सक्षम असेल तेवढे विजयाचे गणित सोपे होते.
महाराजांच्या गुप्तहेर खात्याचे प्रमुख बहिर्जी नाईक . शिवाजी महाराज आणि बहिर्जी नाईक यांची पहिली भेट शिवाजी महाराज 9 वर्षांचे असताना शहाजीराजे यांचा सोबत बंगळूर येते राहत होते, शहाजी राजे त्या वेळेस आदिलशाहीत काम करत होते पण त्यांच्या मनात स्वराजाचे स्वप्न होतं.
आऊसाहेब जिजाऊंना स्वराजची चिंता होती म्हणून त्यांनी शहाजी राजांच्या परवानगीने शिवरायांना महाराष्ट्रात आणले, महाराज पुण्यात आले. तेव्हा बहिर्जी नाईक हे एक रामोशी समाजाचं पोर , पोटाची खळगी भरण्यासाठी रानावनात फीरुन शिकार करत होत.
लोकांच्या नकला करण्यात आणि वेषांतर करण्यात ते पटाईत होते. जेव्हा महाराज पुण्यात आले तेव्हा पासून बहिर्जीना महाराज कसे राहतात कसे दिसतात हे पाहण्याची ओढ लागली होती. मग एके दिवशी महाराजांचा माग काढत रानात बहिर्जी येत होते शिवबाराजे आपल्या सवंगड्यासोबत झाडा झूडपात खेळत होते.
खेळता खेळता आपल्या सवंगड्याला भाला आणि तलवारबाजी च शिक्षण देत होते. बहिर्जी महाराजांना शोधत शोधत रानात आले तेंव्हा कोठूनतरी मोर ओरडण्याचा आवाज आला आणि पोराचा गळखा आला तेव्हा बहिर्जीना महाराजांची चाहूल लागली तेव्हा महाराजांचा दिशेने आले तेव्हा शिवबा राजे विटीदांडू खेळत होते.
तेंव्हा मोठ्या धीराने बहिर्जी ने विचारले तुमच्यापैकी शिवबा राजे कोण आहेत? राजे सावध होते तेव्हा राजे पुढे सरसावले आणि म्हणाले मी आहे शिवबा कायरे काय काम आहे? तेव्हा बहिर्जी म्हणाले मुजरा राजे या राजाला पहायचे होते त्यासाठी आक्खे पुणे पालथे घातले पण आज तुमचे दर्शन झाले, धन्य झालो!
राजे मी पण येऊ का तुमच्यात खेळायला? शिवाजी राजे बहिर्जी च्या बुद्धीवर खुश झाले आणि म्हणाले तू आज पासून तू आमचा मयतरगडी बहिर्जी ने पहिल्या त भेटीत महाराजांचं मन जिंकलं आणि त्या नंतर बहिर्जी महाराजांच्या गुप्त हेर खात्याचे प्रमुख झाले.असे हे बहिर्जी महाराजांचा तिसरा डोळा च होते..
धन्य ते बहिर्जी आणि धन्य ती शिवभक्ती.
जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे!!
Comments
Post a Comment