व्हाट्सअप चॅट चा स्क्रीनशॉट घेत असाल तर सावधान.. तुम्ही जर व्हाट्सअप चॅट चा स्क्रीनशॉट घेतला तर समोरील व्यक्तीला इथून पुढे तीन ब्लूटिक जातील आणि त्याला लगेच समजेल की समोरच्या व्यक्तीने आपल्या चॅटचा स्क्रीनशॉट घेतलेला आहे.
पर्सनल चॅट सुरक्षित राहण्यासाठी व्हाट्सअप कंपनीकडून ही सिक्युरिटी टेस्ट केली जाणार आहे तेव्हा तुम्ही जर व्हाट्सअपचे स्क्रीनशॉट घेत असाल तर सावधान! आता समोरील व्यक्तीला ते नोटिफिकेशन द्वारे कळवण्यात येणार आहे, प्रायव्हेट चॅट सुरक्षित राहावं यासाठी व्हाट्सअप सध्या या भन्नाट संकल्पनेवर काम करत आहे.
युजरने एखाद्याला मेसेज पाठवला तर एकच टिक दिसतं आणि समोरच्याने जर तो वाचला तर दोन टिक होऊन ते निळं दिसतो. पण आता जर दोघांपैकी एकाने स्क्रीनशॉट घेतला तर दोन टिक ऐवजी तीन टिक पाहायला मिळतील आणि समोरच्या व्यक्तीला नोटिफिकेशन मिळेल की आपला चॅट चा स्क्रीनशॉट घेण्यात आलेला आहे.
आणि आता लवकरच या फिचरच्या चाचणीला सुरुवात होणार आहे. त्यामुळे जर तुम्ही कोणाच्या पर्सनल चॅट चा स्क्रीन शॉट काढत असाल तर सावधान!!! असं जरी असलं तरी व्हाट्सअप कंपनीने अधिकृत असे काहीही जाहीर केलेले नाही.. आणि आता लोकांमध्ये या फीचर्स बद्दल उत्सुकता वाढताना दिसत आहे.
Comments
Post a Comment