जीवनावश्यक वस्तूंच्या दुकानामध्ये लवकरच वाईन मिळणार आहे. राज्य सरकार लवकरच या संदर्भात अधिसूचना जारी करणार आहे. वाईन मध्ये कमी अल्कोहोल असल्यामुळे या निर्णयाची शक्यता आहे.
त्यामुळे इथूनपुढे किराणा दुकानांमध्ये सुद्धा वाईन मिळणार आहे. आणि लवकरच या बाबतची अधिसूचना जारी करण्याच्या तयारीत राज्य सरकार दिसत आहे. यासह किराणा दुकानांसह बेकरी मध्ये सुद्धा वाईन विक्री करण्याचा मार्ग मोकळा होताना दिसत आहे.
वाईनमध्ये कमी अल्कोहोल असल्यामुळे या निर्णयाची शक्यता आता अधिकच आहे. सोबतच आता आपल्या सर्वांची लाडकी वाईन आता बॉटल ऐवजी कॅन्ड मध्ये सुद्धा विक्री होताना दिसणार आहे. आणि लवकरच राज्यसरकार याबाबत चा अध्यादेश काढणार आहेत.
अनेक हॉटेल्स मध्ये अनेक पदार्थाच्या रेसिपी मध्ये देखील वाईन चा समावेश असतो. सरकारने मंगळवारी १० रुपयांचा नाममात्र अबकारी कर लावला आहे आणि त्यामुळे राज्याच्या तिजोरीत ५ कोटी रुपयांची भर पडणार आहे.
Comments
Post a Comment