राज्याभिषेकानंतर महाराजांनी दक्षिण दिग्विजय ही मोहिम हाती घेतली या मोहिमेनुसार गोवळकोंडा ची राजधानी भागानगर म्हणजे आत्ताचे हैदराबाद कडे वळवले कुतुबशहा तेथील बादशहा होता कुतुबशहाने लढाई न करता तह केला व दोस्ती ची भूमिका घेतली. महाराज जेव्हा भागानगर जवळ आले तेव्हा दोन गाव पुढे जाऊन कुतुबशहाने महाराजांचे स्वागत केले आणि विशेष स्वतः कुतुबशहाने महाराजांच्या पालखीला खांदा दिला, जंगी स्वागत कुतुबशहाने महाराजांचे केले.
कुतुबशहाणे महाराजांना राजधानी दाखवली. खजाना, अश्व शाळा व हत्ती शाळा दाखवली कुतुबशहाने महाराजांना विचारले तुमच्याकडे आहेत का असे लडाकू हत्ती महाराजांना प्रश्न पडला कारण महाराजांनी लढाईसाठी हत्तीचा वापर कधीच नाही केला कारण सह्याद्री सारखे डोंगराळ भागात हत्ती कसे वापरणार? मराठे विजेच्या वेगाने शत्रूवर चढाई करत आणि हत्ती लढाईचा वेग कमी करत असे म्हणून महाराज हत्ती वापरत नसे तेव्हा महाराजांनी उत्तर दिले आमच्याकडं नाहित असे हत्ती पण आमचा एक एक मावळा हत्तीच्या बरोबर आहे म्हणूनच संख्येने जास्त असलेल्या गणिमाला पळता करतात.
कुतुबशाह महाराजांना म्हणाला महाराज आपल्या मावळ्यांच्या पराक्रमाबद्दल फक्त ऐकून आहोत प्रत्यक्षात कधी पाहण्याची संधी मिळाली नाही तेव्हा या मैदानात तुमचा एका मावळ्याची एखाद्या हत्तीची झुंज झाली तर भागनगर नगरीतील लोकांना त्यांच्या कानावर विश्वास बसेल कुतुबशाह ला काय म्हणायचं आहे हे महाराजांच्या लक्षात आलं तेव्हा महाराज म्हणाले हत्ती सोबत झुंज देण्यासाठी आपण एखादा मावळा निवडावा मग कुतुबशहाने सर्व मावळ्याकडुन नजर फिरवली व त्याच्या दृष्टीत पडणारा एक काटक मावळा निवडला.
कुतुबशहाने विचारले हा मावळे देईल का हत्ती ची झुंज महाराज आत्मविश्वासाने म्हणाले तुमचा हत्तीच काय इंद्राचा ऐरावता ला ही लोळणारे माझे मावळे शक्तिमान आहेत महाराजांनी त्याला इशारा करतात तो तयार झाला महाराजांना मुजरा केला व मागचा पुढचा विचार न करता व मैदानात छाती फुगवत उभा राहिला.
त्या मर्द मावळ्यांचे नाव होते येसाजी कंक त्याने महाराजांसोबत अनेक मोहिमा पार पाडल्या होत्या कुतुबशाह नि त्याचा समोर फार मोठा हत्ती उभा केला . हत्तीला येसाजीचा अंगावर सोडले महाराज काळजीत पडले पण तेवढा विश्वास होता येसाजीवर महाराजांचा येसाजी नि हत्ती शी झुंज दिली आणि हत्ती वैतागून गेला आणि खाली बसायला लागला तेवढ्यात ऐसाजीनी कमरेची तलवार काढली आणि हत्ती चा सोंडे वर वार केला आणि काही वेळाने हत्ती गतप्राण झाला कुतुबशाहाचा वेड्या हट्टा मुळे एका निष्पाप प्राण्याचा बळी गेला परंतु शिवाजी महाराजांचा एक मावळा हत्तीच्या बरोबर आहे यावर कुतुबशाहाचा विश्वास बसला त्याने येसाजी ला गळ्यातला मोत्याचा हार बक्षीस म्हणून देऊ केला त्यावेळेस येसाजी म्हणाले माझे कौतुक करायला माझा राजा समर्थ आहे महाराज खूप खूप खुश झाले !!!
Comments
Post a Comment