येत्या काही वर्षा मध्ये मुंबई आणि कोकणच्या काही भाग समुद्राखाली जाण्याची भीती आहे. जगातला सर्वात मोठा बर्फाचा साठा म्हणजे अंटार्टिका खंड या अंटार्टिकाच्या पश्चिमेकडे आहेत थ्वाईट ग्लेशिअर या हिम खंडाचा एक मोठा भाग तुटून समुद्रात पडण्याची भीती आहे.
ह्या हिमनगांचा आकार आंध्र प्रदेश सारख्या मोठ्या राज्या एवढा अवाढव्य आहे अमेरिकन जिओग्राफीकल युनियनच्या बैठकीत शोध निबंध सादर करण्यात आले आहे यामध्ये थ्वाईट ग्लेशियर बाबत चिंता व्यक्त करण्यात आली आहे ग्लोबल वार्मिंगमुळे ग्लेशियर वितळत असून त्याला एक मोठी भेग पडल्याच या शोधनिबंधात म्हटलं आहे.
ही भेग रुंदावत गेली तर हा अवाढव्य हिमनग समुद्रात कोसळेल त्यामुळे समुद्राची पातळी तब्बल पाच टक्क्यांनी वाढण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. शिवाय हा हिमनग वेगळा झाला तर उर्वरित ग्लेशियर वितळण्याचा वेग आणखी वाढून समुद्राच्या पातळीत वाढ होऊ शकते.
हवामान बदलाचा जो वेग आहे (आपण त्याला गाडीत एक्सलेटर वर पाय ठेवला म्हणतो आणि तो पाय काढतच नाहीये तसा हवामान बदलाचा वेग तो अनियंत्रित होत चाललेला आहे) आणि यामुळे व अपरिवर्तनी हानी त्याला होते हीच घटना आता अंटार्टिका आपल्याला दाखवून देत आहे.
या वर्षीच्या सुरुवातीला नासा ने थ्वाईट ग्लेशियर ला पडलेली भेग भूगर्भ तज्ञा च्या निदर्शनास आणून दिली होती 1980 नंतर या हिम खंडातील सहाशे अब्ज टन बर्फ वितळला. आता आंध्र प्रदेश एवढा हिमनग समुद्रात आला तर ती महाप्रलयाची नांदी ठरणार आहे .
थ्वाईट ग्लेशियर च दुसरं ही नाव आहे डूम्सडे ग्लेशिअर ते डूम्सडे म्हणजे महाप्रलयाचा दिवस वेळीच ग्लोबल वॉर्मिंग बाबत उपाययोजना केल्या नाहीत तर मुंबई कोकणातही समुद्र घुसण्यास वेळ लागणार नाही
Comments
Post a Comment