सलग दोन ते तीन वर्षे लोकांच्या मनावर हाकामारी च्या अफवांनी गारुड घालून ठेवला होता. अगदी नावाप्रमाणेच हाकामारी रात्री-बेरात्री लोकांच्या घरा समोर येऊन उभी राहायचीआणि घरातील प्रमुख व्यक्तीचे नाव घेऊन त्याला एका स्त्रीच्या आवाजात हाक मारायची जर त्या पुरुषाने हाकामारी च्या हाकेला ओ दिली तर मात्र त्या व्यक्तीची खैर नसायची असं म्हणतात.
हाकामारी त्या व्यक्तीला उचलून स्मशानभूमीत न्यायची आणि मग दुसर्या दिवशी ती व्यक्ती संदिग्ध अवस्थेत एखाद्या झाडावर उलटी लटकलेले आढळून यायची. एक तर त्या व्यक्तीची बोबडी वळलेली असायची नाही तर ती व्यक्ती मनोरुग्ण प्रमाणे वागायची.
हाकामारी च्या भुतांनि तरुणांपासून अबालवृद्धांपर्यंत सर्वांमध्ये भीती निर्माण केली होती. तेंव्हा असं सांगण्यात यायचे की हकामारी तीनदा आवाज देते आपण जर हाकेला प्रतिउत्तर दिल तर आपली काय खैर नाही. लोक घरावर X आशी फुल्लि काढत किंवा राम राम असे लिहीत.
या हाकामारीच्या अफवेमुळे बाबा बुवा मांत्रिक तांत्रिक लोकांच फारच पावलं होत. त्यांच्यासाठी हाकामारी बिझनेस मॉडेल बनला होता. लोकांना गंडेदोरे विकण्यापासून ते लोकांच्या घरात वास्तुशांतीपर्यंत या सगळ्या गोष्टी हे बाबा लोक करून द्यायचे आणि त्यातून बक्कळ पैसा कमवायचे.
बऱ्याच वेळा चर्चेदरम्यान लोक म्हणायचे ही हाकामारी ची अफवा ही या बाबा लोकांचीच असावी कदाचित ते खरे देखील असेल कारण बऱ्याच अफवांचे जनक हे बाबा लोकच असतात या लोकांमुळे अश्या अफवांना हवा मिळते आणि लोकांमध्ये भीती निर्माण होऊन त्यांच्या धंद्याला चांगले दिवस येतात. तर हकामारी ही एक अफवा होती या मध्ये काही शंकाच उरत नाही .
Comments
Post a Comment