तुम्हाला प्रश्न पडला असेल की एक लिटर दुधाला दहा हजाराचा भाव कसा आणि ते कोणाचं दूध आहे तर हे सर्व आपण खाली पाहणारच आहोत. गाढविणीच्या दुधाने आजार बरे होतात?? कोण बनवत आहे तुम्हाला गाढव?
गाढवाची उपमा दिलेली कोणालाच आवडत नाही, गाढव म्हणजे ओझे उचलणारे सांगकाम्या प्राणी. पण हिंगोलीत याच गाढविणीने सध्या भाव खाल्ला आहे. गाढविनीचं एक लिटर दुध दहा हजाराला विकल जात आहे.
हे दूध पिल्याने दुर्धर आजार बरे होतात असा दावा दूध विक्रेत्यानंकडून केला जात आहे. हिंगोली जिल्ह्यात सध्या काही लोक गाढव घेऊन आले आहेत ते लाऊड स्पीकर लावून या दूधाच महत्व हिंगोलीकराना पटवून देत आहेत.
ही मंडळी कर्नाटकातून आलेत अस सांगितलं जातं आहे. विशेष बाब म्हणजे या दुधाला लोकांमधून सुद्धा खूप मागणी आहे. गाई म्हशी च्या दुधाला एवढा भाव नाही पण गाढवाच दुध हे लोक 10 हजार रुपये लिटर ने विकत आहे. या विषयी तज्ज्ञ सोबत चर्चा केल्यानंतर असे निदर्शनास आले की या दुधात प्रोटीन आहेत पण या दुधाने कुठलाही रोग बरा होत नाही
Comments
Post a Comment